‘कुमार निर्माण’ हा ‘एम. के. सी. एल. नॉलेज फौंडेशन’, पुणे व ‘निर्माण, सर्च, गडचिरोली’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीयुत विवेक सावंत व डॉ. अभय बंग यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा ‘विद्यार्थी केंद्रित’ कार्यक्रम आहे. शालेय वयोगटातील मुला-मुलींमधील सामाजिक बुद्धिमत्ता विकसित करणे व त्यांच्यामध्ये वैश्विक मानवी मुल्यांची रुजवणूक करणे हे याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

तुम्हालाही तुमच्या परिसरातील मुलांसोबत अशा पद्धतीने जोडून घेऊन काहीतरी करण्याची इच्छा असेल तर कुमार निर्माणशी स्वतःला नक्की जोडून घ्या. सोबत आम्हाला नक्की संपर्क करा.

कुमार निर्माण हा उपक्रम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी.


                                       

कुमार निर्माण मुळे आम्ही एकत्र आलो, आमची एकी वाढली. आम्ही दुसर्यांना मदत करू शकतो हे कळाले.
चैतन्य क्षीरसागर
माझे व्यासपीठावर जायचे धाडस वाढले, पर्यावरणविषयक नवीन माहिती मिळाली, इतरांचा विचार करण्याची सवय लागली.
साक्षी सातव
आपण चांगले काम करत असू तर कोणी वाईट म्हणल्याने काही फरक पडत नाही, व माझा आत्मविश्वास वाढला आहे
ऐश्वर्या काळे
विद्यार्थी दशेत जीवन कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने राबवलेला स्तुत्य उपक्रम म्हणजे कुमार निर्माण , मागील फक्त एका वर्षामध्ये मुलांमध्ये खूप सकारात्मक बदल जाणवले, त्यांच्या स्वत:विषयक जाणीवा, पर्यावरणविषयक संवेदनशीलता ई जागृत होण्यास सुरुवात झाली.
कीर्ती कोलते (निमंत्रक)
मी आधी पाण्याकडे दुर्लक्ष करत होते, पण आता मी पाणी खूप काळजीपूर्वक वापरते आणि इतरानाही पाणी जपून वापरा असे सांगते.
आर्या काळे
चांगले काम व्हायला हवे असेल तर लोकांशी कसे बोलायचे हे समजतंय, आणि कुठलंही काम करताना लाज वाटत नाही, अगदी प्लास्टिक कचरा उचलायची देखील
सई केळकर
मधुरा आता वेळेच व्यवस्थापन व्यवस्थित विचार करून करते, ती तिच्या गोष्टींना प्राधान्यक्रम देण्याचा प्रयत्न करते.
सौ.अनघा थत्ते (पालक)
मागील वर्षभरात अस जाणवत गेल कि या मुलींवर विश्वास आणि जबाबदारी टाकत गेले कि खूप चांगली काम त्या स्वबळावर, एन्जॉय करत सहजतेने पार पाडू शकतात, या कामांसाठी त्या विचारही योग्य दिशेने करतात.
सौ.भाग्यश्री हलदुले (निमंत्रक)
माझा confidence खूप वाढलाय, मी आतापर्यंत कधीच कशात भाग घेतला नव्हता, मात्र आता माझी काही सादरीकरण कराय्चीदेखील कधीही तयारी आहे.
अंकिता खेतकर